अखेर…. दौंड नगरपालिकेला मिळाले पुर्णवेळ मुख्याधिकारी.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-बऱ्याच महिन्यांपासून चर्चेचा विषय बनलेल्या दौंड नगरपालिकेत….छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
संदर्भातील नियमानुसार क्र-१२{१}मधील तरतुदीनुसार श्री.संतोष टेंगळे,मुख्याधिकारी गट-अ यांना वाटप झालेल्या छत्रपती संभाजीनगर विभागा ऐवजी त्यांना पुणे विभाग बदलून दिल्याचे आदेश आहे.राज्यापालांकडून हे आदेश देण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील ४{४} व ४{५} मधील तरतुदीनुसार,गट-अ संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे म्हटले असून त्यांची पदस्थापना, मुख्याधिकारी दौंड नगरपरिषद येथे करण्यात आली आहे.
श्री.संतोष टेंगळे यांना दि.०६ एप्रिल २०२३रोजी,दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले असून, सध्याच्या मुख्याधिकारी श्रीमती.निर्मला राशिनकर यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे,असे या आदेशात नमूद केले आहे.