अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.
दौंड:दौंड येथे काल दिनांक-२९/०५/२०२० रोजी अवैधरीत्या वाळू वाहतुक व शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळू वाहतूक करत असल्याने व कोव्हीड-१९ संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये व शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने कारवाई करण्यात आली आहे.भारत बेंज डंपर.पोलिस उपनिरीक्षक उपविभागीय कार्यालय दौंड.श्री.नितीन मोहिते,पो.हवा.सुळ,पो.हवा.थोरात,दौंड पोलिस स्टेशन पथकाने पकडला असून डंपर चालक रस्त्यामध्ये डंपर सोडून फरार झाला असल्याने अज्ञात चालक मालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डंपर नं-एम.एच.१६ सी.सी.२२८२व २७.२००रुपये किमतीची साडे तीन ब्रास वाळूची वाहतूक करताना मिळून आली फिर्याद पो.ना.डोईफोडे यांनी दिली आहे.व भारतीय दंड विधान कायदा कलम ३७९,१८८,२६९,३४ नुसार कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पो.ना.भरत जाधव यांनी दिली.