अशैक्षणिक कामावर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचा बहिष्कार

1 0
Read Time3 Minute, 58 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-शिक्षकांना दिलेली अशैक्षणिक कामे (BLO व इतर)काढून घेण्यात यावीत .या कामावर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचा बहिष्कार असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .आमच्या प्रतिनिधींशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २००९ नुसार केंद्र सरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ (अ) मध्ये प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकारांत समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, Right of Children to Free and Compulsory Education Act, २००९ (No. ३५, २००९), केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच्या २७ ऑगस्ट २००९ च्या राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. तसेच, भारत सरकारच्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक ०१ एप्रिल २०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू व काश्मिर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.
यातील भाग क्र १२ ,अनुभाग क्र १ ,मुद्दा क्र २७
‘ कोणत्याही शिक्षकाला दशवार्षिक जनगणना, आपत्ती नियंत्रणाची कामे किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा विधानमंडळे किंवा यथास्थिती संसदेच्या कामाव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक प्रयोजनासाठी कामावर लावण्यात येऊ नये असे नमूद केले आहे .या सर्व कायदेशीर बाबी विचारात घेऊन शिक्षकांना दिलेली अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत .अन्यथा या अशैक्षणिक कामावर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ बहिष्कार घालत आहे याची नोंद घ्यावी .याबाबतच्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शिक्षणमंत्री दीपक केसरकर ,पुण्याचे जिल्हाधिकारी ,
अतिरिक्त प्रधान सचिव , शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र राज्य
शिक्षण आयुक्त ,शिक्षण आयुक्तालय , पुणे
शिक्षण संचालक , (प्राथमिक )संचालनालय पुणे
शिक्षण संचालक , (माध्यमिक)शिक्षण संचालनालय ,पुणे
विभागीय आयुक्त , विभागीय आयुक्त कार्यालय ,पुणे
शिक्षण उपसंचालक , उपसंचालक कार्यालय ,पुणे
मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद पुणे यांना पाठवण्यात आल्या आहेत .यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण व राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळींबे ,राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य उपाध्यक्षा पूर्णिमाताई रणपिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.