अधिकार आमचा ( विशेष) : चाळीसगाव व अंबरनाथ येथील लाखोंच्या मनात घर करणारे स्व. पप्पू दादा गुंजाळ आजच्या दिवशी आमच्या मनाला चटका लावून गेले. एक हसमुख मोठ्या मनाचा राजा माणूस म्हणजे स्व. पप्पू दादा आपल्या प्रेमळ स्वभावाने मन जिंकली,छोट्यांच्या पाठीवर त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून शाबशी ची थाप मारणारे,मोठ्यांना मान देणारे, नेहमी कार्यकर्त्यांना हिम्मत दिली सर्वांना किंमत दिली,सर्व सामान होते त्यांच्या नजरेत कधी कोणाचे मन दुखविले नाही फारच कमी कालावधीत चाळीसगावात आपला ठसा उमटविला, स्वतःची एक वेगळी अशी छाप तयार केली ,छोटे असो की मोठे सर्व दादांचे जवळ आले होते, चाळीसगावकरांच्या सुखा दुःखात नेहमी सात दिली नेहमी आपल्या सर्व चाहत्यांच्या पाठीशी उभे राहिले ,थोड्याच कालावधीत चाळीसगावतील गोर गरीब जनतेच्या गळ्यातील ताईत बनले राजकीय वारसा नाही तरी स्वतःचे राजकीय विश्व तयार केले लोकनेते व कार्यसम्राट म्हणून ओळख निर्माण केली शिवसेना जळगाव उपजिल्हा प्रमुख व अंबरनाथ मा उपनगरअध्यक्ष पद भूषविले सर्वाना वाटत होते की काही चांगलं होणार पण आजच्या या २५ डिसेंबर २०१५ रोजी हा काळा दिवस आला दादा आम्हाला सोडून निघून गेले स्वप्नात सुद्धा येणार नाही असे घडले आम्ही सुन्न झालो पण आज सुद्धा समाजसेवेची प्रेरणा मिळते आम्हाला दादांच्या विचारांमुळे दादांनी आम्हाला पोरकं केले पण आज दादांच्या चाहणाऱ्यांना पाहिले त्यांनी केलेली चांगली कामे पाहिली तर असे वाटते के दादा आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये जिवंत आहेत त्याचे विचार त्यांचा स्वभाव आज पण प्रामाणिक कार्यकत्यानंमध्ये पाहायला मिळते, एक दादा आज अनेकांच्या हृदयात आहे स्व पप्पू दादा गुंजाळ यांच्यावर लिहावे मी इतका मोठा नाही माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांनी स्व. पप्पू दादा गुंजाळ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो
एक कार्यकर्ता दादांचा