अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
सोलापूर-दि 5 सप्टेंबर 2021 रविवार शिक्षक दिनी शिक्षकाची व्यथा 6 वर्षपासून सेवा देणाऱ्या शिक्षिकेस वेतनाची प्रतीक्षा,नियमित वेतन लवकर सुरू करा ,अन्यथा आंदोलन करू गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांचा इशारा.
सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील पहिल्या महिला शिक्षिका लवकर येतील सलग सहा वर्ष पूर्ण करूनही नियमित वेतनापासून वंचित आहेत .त्यांना वेतन लवकर सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिला आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,श्रीमती शीतल बाबुशा काळे सहशिक्षिका या पदावर इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे 1 जुलै 2016 पासून कार्यरत आहेत . परंतू त्यांना अद्याप नियमित वेतन सुरू करण्यात आलेले नाही .त्यांचा नियमित वेतनाचा प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागकडे प्रलंबित आहे .त्यामुळे त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .या बाबीचा जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार करून श्रीमती शीतल बाबुशा काळे यांचा नियमित वेतनाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा .श्रीमती काळे या सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत .हा समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे .ही वस्तुस्थिती असतानाही माध्यमिक शिक्षण विभाग श्रीमती शितल काळे यांच्या नियमित वेतनाच्या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ,ही बाब खूप गंभीर आहे .
तसेच जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्याच्या प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे .यामागे प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक षडयंत्र करत आहेत अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे .या षडयंत्राला बळी न पडता प्राथमिक शिक्षण विभागाने लवकरात लवकर मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे .श्रीमती काळे यांच्या वेतनाचा प्रश्न तसेच मुख्याध्यापक पदोन्नती या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे .
या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रशासनाकडून उशीर झाल्यास संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल व याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनद्वारे इशारा देण्यात आला आहे . या निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड ,
अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे , जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग यांना देण्यात आले आहेत .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य सल्लागार दिगंबर काळे,जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण काळेल , जिल्हा उपाध्यक्ष विठोबा गाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर लोणकर, जिल्हा महासचिव आनंद बनसोडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .