आधार माणुसकीचा दौंडकरांसाठी या ग्रुपच्या वतीने ६५ कुटुंबासाठी घरगुती लागणाऱ्या वस्तु चे वाटप
दौंड(पवन साळवे दि 21):-आधार माणुसकीचा दौंडकरांसाठी या ग्रुपच्या वतीने पंचायत समिती दौंडचे गट शिक्षण अधिकारी नवनाथ वणवेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
संत तुकडोजी महाराज विद्यालयात लॉकडॉनमुळे आश्रीत आसणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या ६५ कुटुंबासाठी घरगुती लागणाऱ्या वस्तु चे वाटप आज दिनांक १७ एप्रिल२०२० रोजी शिक्षण विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांच्या हस्ते गट विकास अधिकारी गणेश मोरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. गरजूंना आपल्या काही सदस्यांच्या हस्ते फुल न फुलाची पाकळी म्हणुन जवळ पास एका कुटुंबास ७६० रुपयांची एक महिना पुरेल इतपत किराणा देण्यात आला .
या प्रसंगी दौंड पंचायत समितीचे सहा.गट विकास अधिकारी बाबा रहिमान मुलाणी,आमचे सहकारी मित्र श्री.विकास कदम, लिंगाळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.एम निगडे भाऊसाहेब इ उपस्थित होते .
आधार माणुसकीचा या ग्रुपच्या वतीने सर्व सदस्याचे मनापासून खूप खूप आभार