संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील बेलगंगानगर येथील इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या चि. गगन चांदसरे याचे आमदार मंगेश चव्हाण यांना एक पत्र काही दिवसांपूर्वी मिळाले होते. त्यात त्याने “दादा, एकदा तुम्हाला भेटायचे आहे…” अशी प्रेमळ विनंती केली होती. तसेच पत्रात त्याने मी बेलगंगानगर येथे निवडणूक प्रचारासाठी आलो असता गगन च्या घरी भेट दिली होती तेव्हा गगन च्या आईने माझे औक्षण केले होते तेव्हाच मला फोटो काढायचा होता मात्र घाईत तो राहून गेला अशी खंत देखील बोलून दाखविली व मला त्या प्रसंगाची आठवण त्याने पत्रातून करून दिली होती.
हे प्रेमळ पत्र वाचून आमदार चव्हाण भारावून गेले आपल्यावर प्रेम करणाऱ्या या छोट्या मित्राला भेटायचे असे मनोमन ठरवले असताना दि 19 ऑगस्ट 2023 रोजी त्याच रस्त्याने जात असताना आवर्जून छोट्या गगन ची त्याच्या घरी भेट घेतली.
अतिशय प्रेमात आणि उत्साहात सर्व चांदसरे परिवाराने आणि बेलगंगा नगर वासीयांनी आमदार चव्हाण यांचे स्वागत केले. आता छोट्या मित्राने एव्हढ्या प्रेमाने बोलावले मग त्याला काही गिफ्ट नाही द्यायचे अस कस होईल… यावेळी छोटा मित्र गगन ला छोटीशी भेट म्हणून सायकल दिली… त्याच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहून समाधान वाटले…
मतदारसंघात काम करत असताना हजारो परिवारांशी कळत नकळत ऋणानुबंध जुळतात… कुठलीही अपेक्षा न ठेवता हे परिवार नाते जोपासत असतात… या प्रेमाचे मोल कुठल्याही मौल्यवान वस्तू शी होऊ शकत नाही हेच खरं..आमदार मंगेश चव्हाण यांनी या वेळी बोलताना सांगितले.