संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगाव(प्रतिनिधी)- शेतकरी पशुधनावर लंपी आजाराने डोके वर काढले होते यामुळे शेतकरी संकटात सापडला होता मात्र जळगाव जिल्हा दूध संघाची प्रशासक म्हणून कमान हातात घेताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ प्रशासक कमिटीची बैठक घेत व्हॅक्सिनेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात लंपी या आजाराच्या शिरकाव्यानंतर भयभीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व वॅक्सिनेशन मोहीम जोरात राबवण्यासाठी दि 8 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दूध संघामध्ये आमदार मंगेश चव्हाण व प्रशासक कमिटीची बैठक झाली होती या बैठकीत जळगाव जिल्हा दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी व कृत्रिम रेतन तंत्रज्ञान यांच्या बैठकीत या भागात लंपी या स्कीन डिसीज आजाराचे गुरे ढोरे आढळत आहे अशा भागात जोरात व्हॅक्सिनेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या जिल्हा प्रशासन व दुध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत आठ हजाराहून अधिक गुरांना व्हॅक्सिनेशन झालेले आहे जळगाव जिल्ह्यात अधिकचे विस हजार व्हॅक्सिनेशन डोस उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली त्यामुळे शेतकऱ्यांनी भयभीत न होता आपल्या गुरांना संरक्षण देण्यासाठी व्हॅक्सिनेशन करून घेण्यात यावे असे आवाहन जळगाव जिल्हा दूध संघ तर्फे करण्यात आलेले आहे