अधिकार आमचा विशेष
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव-आज आमदार साहेबांचा वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कर्तृत्वाने कमी कालावधीत लौकिकता मिळविलेले तालुक्याचे शेतकरी योद्धा म्हणून प्रसिद्ध असे आमदार म्हणजे मंगेश चव्हाण
आपणास तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले आपण जनतेच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडले सुध्दा शेतकरी हितांसाठी अग्रेसर राहत आंदोलने केलीत आपले कर्तृत्व आपली ओळख करून देते आज आपला वाढदिवस आपल्या वाढदिवसाच्या निमित्त तालुकावासीयांना आपल्या कडून रिटर्न गिफ्ट म्हणून तालुकावासीयांना दिलेला शब्द गुटखा हद्दपार करणार असल्याचे सांगितले होते आपण स्वतः गुटख्याच्या ट्रक चा पाठलाग करत गुटख्यानने भरलेली ट्रक धरून पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन केली कारवाई झाली शहरात काही दिवस गुटखा बंदी राहिली, आपण लोकप्रतिनिधी म्हणून दाखविलेली जबाबदारी आपले कर्तव्य समजून केलेल्या कार्याचा प्रभाव पाहत शहरातून गुटखा हद्द पार होणार असे वाटले होते,मात्र पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थी झाली गुटखा विक्रीने पुन्हा जोर धरला व गुटखा माफिया पुन्हा सक्रिय झाले,आज जवळ पास वर्ष झाला मात्र गुटखा बंदी झाली नाही आपण दिलेला शब्द पूर्ण करायला हवा गुटखा हद्द पार होणार का? आपण आपल्या तालुक्यातील जनतेवर खूप प्रेम करता मात्र तरुण पिढी गुटख्याच्या विळख्यात फसून गुटख्याच्या आहारी गेली असून आरोग्य गमावत आहे,आपण पुढाकार घेत तरुणांच्या जीवाशी खेळ थांबवावा अशी अपेक्षा करतो आपणास वाढदिवसाच्या पुनःश्च लाख लाख शुभेच्छा.