
“आय लव्ह चाळीसगांव” म्हणून चालणार नाही तर खरोखर “आय लव्ह चाळीसगांव”करून दाखवावे लागेल.
अधिकार आमचा विशेष
खुर्चीच्या प्रेमात,मतदारांना विसरलेले जनसेवकांसाठी
व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात. हा दिवस सेंट व्हॅलेन्टाईन नावाच्या ख्रिश्चन हुतात्म्यांच्या नावाने साजरा करतात असो मात्र प्रेम हे प्रेम असते ते आई,बाबांचे आपल्या मुलांनावरील ,असो की बहीण भावांचे असो की पती पत्नी चे असो असे अनेक प्रकार आहे,मात्र प्रेमात महत्वाची भूमिका असते ती आपुलकीची तशीच काही आपुलकी जी जनसेवकांना इलेक्शन पूर्वी मतदारांसोबत असते ती इलेक्शन नंतर असते का?आज जनसेवकांना आपुलकी आहे पदाची,सत्तेची मात्र विकासा सोबत दुरावा का? नुसतं पदासाठी नको ते करायचे आणि पद आले की फक्त पद मिरवत पदा पासून आपला लाभ करत जनते कडे दुर्लक्ष करून वार्डाच्या विकासाला बाजू करत स्वतःच्या विकासावर भर टाकत टाकत स्वतःला इतके उंच घेऊन जायायचे की मतदारांचा मान सन्मान त्यांना छोटा दिसायला लागतो मतदारांची किंमत ठरवली जाते? मोठं मोठ्या गोष्टी करत स्वतःलाच मोठं करण्याची धडपड सुरू आहे? पदाचा सदुपयोग सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी दुरुपयोग करण्याची कला अवघ्या काही दिवसात आत्मसात करत असतात,प्रेम सत्तेवर करा मात्र सत्तेचा उपयोग विकास कामांसाठी झाला पाहिजे,पद मिळण्यासाठी चा आटापिटा ठीक आहे मात्र विकास करण्याची जिद्द पण असायला हवी,ज्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावत तुमच्या मुळे लोकांसोबत विरोध करत तुमच्या सोबत खंबीर उभे राहिले,त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी का असे ना तुम्ही थोडे तरी गंभीर व्हायला हवे,आज शहरात कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या गोष्टी होतात मात्र रस्ते पूर्ण पणे खराब झाले “डागडुजी करत दुरुस्ती झाली नावाला,रस्ता एक सुद्धा चांगला नाही चाळीसगांवाला”असे म्हणण्याची वेळ चाळीसगांवकारांना आलेली आहे,काही गटारी तुडुंब भरल्या आहेत,शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात,लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,लोकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडला असून आरोप प्रत्यारोपाच्या खेळात दिशाभूल करत नुसतं राजकारण करणे थांबायला हवे “ये पब्लिक है सब जाणती है” विसरून चालणार नाही आता ती वेळ मतदारांची सुरू झाली आहे पण क्षणीक प्रेमाला बळी न जाता जो चाळीसगांव शहरावर प्रेम करेल त्यालाच संधी अन्यथा नुसती चमकोगिरी नको,लिहिण्यास खूप काही आहे मात्र आज फक्त प्रेमाच्या दिवशी प्रेमाने लिहण्याचे कारण एवढेच की नुसतं”आय लव्ह चाळीसगांव” म्हणून चालणार नाही तर खरोखर “आय लव्ह चाळीसगांव”करून दाखवावे लागेल.
Average Rating