
एकाच दिवशी चार मेडीकलवर चोरट्यांचा डल्ला,मेडिकल असोसिएशनचे खासदारांना निवेदन: अतिरिक्त तपास अधिकारी नेमन्याची खासदार उन्मेष पाटील यांची मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव — एकामागे एक चार मेडिकलवर चोरीच्या घटनेने मेडिकल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या कोरोना महामारीत रांत्रदिवस काम करणारे मेडीकल व्यावसायिक कोरोनायोद्धा आहेत. चोरीच्या घटनेने त्यांचे मनोबल खच्चीकरण झाले असून पोलीस प्रशासनाने अतिरिक्त तपास अधिकारी नेमावा. येत्या तीन दिवसांत मुद्देमालासह आरोपींना अटक करा. अशी मागणी वजा आदेश आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पोलीस प्रशासनास दीले आहे.
शहरातील मेडीकल व्यावसायिकानी आज खासदार उन्मेश दादा पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाशी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सदर आदेश दिले.
याप्रसंगी चाळीसगाव मेडिकल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव प्रेमसिंग पवार , उपाध्यक्ष विनोद जैन, सहसचिव एकनाथ पाटील, कार्यकारी सदस्य मंगेश महाजन, योगेश येवले, प्रशांत मालू, पुष्पाताई चौधरी, संजय ब्राह्मण कार,संजय वाघ, संदीपभाऊ बेदमुथा, वसंतराव चव्हाण, योगेश येवले यांच्यासह अनेक मेडिकल व्यवसायिक बांधव उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पोलिस अधीक्षक तसेच स्थानीक पोलीस प्रशासनाशी संपर्क करीत केमिस्ट बांधव “कोरोना योद्धा” असून एकाच वेळी चार घटना घडल्याने घाबरला आहे.रात्रीच्या गस्त वाढवून येत्या तीन दिवसात चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी अतिरिक्त तपास अधिकारी नेमावा. मुद्देमालासह आरोपींना अटक करावी. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी केली. यावेळी चाळीसगाव मेडीकल डीलर्स असोशीएशनच्या वतीने खासदार उन्मेश दादा पाटील यांना निवेदन देण्यात आले.
Related

More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating