अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी जाणार बेमुदत संपावर जाणार आहेत अशी माहिती, दत्तात्रय तिगोटे, अमोल पवार, अमोल आटोळे, शैलेश मोरे, गणेश जागडे, पांडुरंग काटे, अंकुश तुरे, प्रविण कारंडे, राजेंद्र लडकत, शिवाजी कदम, जगन्नाथ खराडे, यांनी दिली.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने दि. 4 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे दौंड आगारातील कामगारी सुध्दा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत त्यामुळे राज्य सरकारने लवकरच निर्णय घ्यावा अशी कामगारानी विनंती केली आहे.
कामगारांच्या संपास पाठिंबा देण्यासाठी वासुदेव नाना काळे प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा, सचिन कुलथे शहराध्यक्ष मनसे, मनोज फरताडे सरपंच कुसेगाव, राहुल भंडारी अध्यक्ष मेडिकल असोसिएशन, मनोहर कोकरे बहुजन मुक्ती पार्टी, डॉ. दत्तात्रय जगताप राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, अशोक मोरे छत्रपती क्रांती सेना तालुका, निलेश बनकर भारत मुक्ती मोर्चा, इरफान सय्यद राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका, चेतनाताई सोनवने, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, यांनी दौंड आगारात येऊन कामगारांना मार्गदर्शन केले व संपास जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले व विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले आहे.