अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी योगिता रसाळ
भारत देश स्वातंत्र होऊन ७५ वर्ष झाले तरी अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजावर जातीय द्वेषातून होत असलेले हल्ले आणि अन्याय काही थांबत नाही कधी संपणार जाती अंताचा लढा -न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष पॅथर जयदीप बगाडे
दौंड(प्रतिनिधी)-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव नांदेड यांना जीवे ठार मारण्यात आले याच्या निषेधार्थ न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष पॅथर जयदीप बगाडे यांनी दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना निवेदन देऊन फास्टट्रक कोर्ट मधून खटला चालवून आरोपी यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. असे निवेदन दिले आहे.
तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी यांना ईमेलने द्वारे निवेदन पाठवले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव नांदेड यांचा 9 समाजकंटकांनी जिव घेतला.सदर आरोपींची सखोल चौकशी करून लवकरात लवकर केस फास्टट्रक कोर्टात चालवून निकाल दयावा व आरोपींना कठोर शिक्षा करत अनुसूचित जाती जमातीच्या जनतेला न्याय द्यावा जर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे इशारा देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा जयदीप बगाडे, विठ्ठल शिपलकर, भारत सरोदे, संतोष जाधव, योगीता रसाळ,लांडगे रोहित पाडळे आदी उपस्थित होते