अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-परिसरातील वीस ते तीस हजार नागरिकांची करगाव रोडवरील रेल्वे वाहतुकीची समस्या 10 ते 12 वर्षापासून कायम आहे.
रेल्वे लाईन खालून तयार करण्यात आलेला बोगदा नसून एक नाल्यासारखाच प्रकार आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय जनमंच पक्ष व मनसे, वामन नगर परिसरातील नागरिकां तर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी 17 मार्च 2024 रोजी बैठक बोलावली होती. या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली होती आणि तो जो बोगदा आहे तिथून जाण्यास येण्यास नागरिकांना त्रास होतो आहे. त्या बोगद्यातील माती खालच्या स्तरावर आणून, रिक्षा, मोटरसायकल व्यवस्थितरित्या पास होतील आणि वाहतूक सुरळीत होईल याची आम्ही दक्षता घेऊ असे आश्वासन रेल्वे अधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर 20 मार्च 2024 रोजी बोगद्यातील वाहतूक सुरळीत झाली होती.
परंतु पावसाळ्यात, बोगद्याजवळील माती वाहून गेल्यामुळे बोगद्यात मोठे खड्डे पडले आहे.आणि पुन्हा वाहतूकीची समस्या उदभवली आहे.
ही समस्या पाहण्यासाठी रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे कन्स्ट्रक्शन इंजिनीअर श्री मीना हे पाहणी करण्यासाठी 3 जुलै रोजी आले होते. या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की,रेल्वे त्यांच्या हद्दीतच काम करेल.नगरपालिकेची ड्रेनेज पाइप लाईन (सांडपाणी वाहून नेणारा पाइप) बोगद्या जवळून गेल्यामुळे तो पाइप सरकवन्याचे काम नगरपालिकेचे आहे.
रेल्वे विभागांने दिनांक 28 मार्च 2024 रोजी ड्रेनेज पाइप लाईन हटवण्या संदर्भात पत्र दिलेले. परंतु आज पर्यंत 4 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा नगरपालिका प्रशासनाने काहीच कारवाई न केल्यामुळे समस्या कायम आहे.
15 जुलै पर्यंत रेल्वे आधिकरी आणि नगरपालिका प्रशासन यांनी समन्वय साधून बोगदा वाहतूकीची समस्या कायम स्वरूपी सोडवावी अन्यथा रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय जन मंच पक्ष पदाधिकारी,मनसे पदाधिकारी तसेच वामन नगर येथील रहिवासी यांनी दिला आहे.