कर्तव्य बजावत असतांना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक सागर देशमुख यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश -गौतम कांबळे
दौंड(प्रतिनिधी)-ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावर असताना अपघातात मृत्युमुखी पडलेले शिक्षक सागर देशमुख यांच्या कुटुंबीयांना शासनाने दहा लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,तहसिलदार वेल्हे यांच्या आदेशाच्या अनुषंगाने निवडणूक कर्तव्यावरती नियुक्त कर्मचारी कै. शिक्षक सागर नामदेव देशमुख हे दिनांक दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक कर्तव्यावर हजर होणंसाठी येत असताना त्यांच्या मोटारसायकलचा मौजे धानेप येथील ओढयाच्या पुलाजवळ सकाळी ९ वाजताच्या दरम्यान ट्रकसोबत अपघात होऊन जागेवरच मृत्यू झाला होता . याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात आला होता . तहसिलदार वेल्हे यांच्या जा क्र. २, दि. १९ डिसेंबर २०२२ रोजीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील वाचा क्र. ३. दि.०३ जानेवारी २०२३ रोजीच्या पत्रान्वये कै.सागर नामदेव देशमुख, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा, कंधारवस्ती, ता. वेल्हे, जि. पुणे यांना ग्रामपंचायत निवडणूकीच्या कर्तव्यावर असताना निधन झाल्यामुळे सानुग्रह अनुदान मिळणेबाबतचा प्रस्ताव मा. ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडे सादर करण्यात आला होता,
मा. ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडील याचा क्र.४, दि. २७ जानेवारी २०२३ अन्वये ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या कै सागर नामदेव देशमुख उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा, कंधारवस्ती, ता. वेल्हे, जि. पुणे यांच्या वारसांना प्रदान करण्यासाठी रु.१० लाख सानुग्रह अनुदान मंजूर करणेत आलेले आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने तहसिलदार वेल्हे व जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले व पाठपुरावा करण्यात आला असे गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी सांगितले देशमुख कुटुंबाला सदरचे अनुदान मिळण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , उपजिल्हाधिकारी निवडणूक शाखा विनायक राऊत ,वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे व शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी शेखर गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले .