अधीकार आमचा विशेष: कांदा,कांदा, कांदा सद्या कांद्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे ,असे लोकांमधून सूर निघू लागले आहे, आणि हो ही लोकं कोणी दुसरी नाही आम्हीच आहोत जी अति पावसामुळे शेतकाऱ्यांचे नुकसान झाले होते तर त्यांच्या साठी भावनिक झालो होतो ,मदतीच्या गोष्टी करत होतो, म आज मदत करायची वेळ आली आहे तर डोळ्यात पाणी येते समजायला मार्ग नाही नेमकं आम्ही शेतकऱ्यांचे हीत पाहतो की नुसत नाटक करतो एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे ,या प्रश्नावर आम्ही चिंतन करण्याची गरज आहे,नुसतं कांद्याचे भाव वाढले ओरडत फिरत आहोत पण भाव का वाढले असतील हा विचार नाही केला पण आम्हला काय आम्हाला तर शेती माल स्वस्त हवा आहे ,मॉल मध्ये १७९ रुपयात ९५० ग्राम टमाटर स्वास घेतो तेही १०% डिस्काउंट मध्ये हसत हसत पण टमाटर काय किलो आहेत ,फायदा झाला की तोटा विचार करत नाही, पण भाजी पाला थोडा महागला की खूप विचार येतात मदत करायचीच होतिना म खा थोडं महाग काय फरक पडणार आहे पण आमच्या देशातील शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना फरक पडेल त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळेल बस एवढेच सांगू इच्छितो की रडणं सोडा समाधानाने रहा कोणी एकटा एकाची मदत करू शकत नाही पण आम्ही सर्व मिळून एकाची नक्कीच मदत करू शकतो.
Read Time1 Minute, 57 Second