संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यात कोणी मोटारसायकल अथवा वाहने गहाण ठेवून पैसे देत असल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी सदरची माहिती देणारे इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल-शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दिनांक 20 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास फिर्यादी श्री. गुलाब वजीर मंसुरी,रा नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव यांचे मालकीची एक बजाज कंपनिची लाल काळ्या रंगाची, हीरककर मोटर सायकल क्रं. MH-19-CB-2484 ही चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन च्या बाहेरुन चोरीस गेले बाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरन 304/2023 मादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीवर आळा घालून गुन्हेगारांना अटक करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राज कुमार, मा.अप्पर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री. अभयसिंह देशमुख यांनी योग्य त्या मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या आहेत.
सदर गुन्हाच्या तपास सुरु असतांना, पोकॉ आशुतोष सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर प्राप्त झाली की आरोपी इरफान बेग आरीफ बेग रा. नगरदेवळा ता. पाचोरा, जि. जळगाव याने सदरचा गुन्हा केला आहे. तरी सदर गुन्हयाचे तपासकामी त्यास ताब्यात घेवून अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवून माहिती दिली की, गुन्ह्यात चोरी केलेली मोटार सायकल संतोष सुधाकर राठोड वय 55 वर्षे रा. तळेगाव तांडा ता. चाळीसगाव यास विकले असल्याचे सांगितले. संतोष राठोड बाबत अधिक माहिती घेता तो लोकांना पैसे देवून त्यांचेकडील वाहन गहाण ठेवून घेत आहे. सदर गुन्हयांचे गांभिर्य लक्षात घेवून सदर तपासकामी स. पो. नि. सागर ढिकले, पोउपनिरी. सुहास आव्हाड पोहेकॉ नितीश पाटील, पोना राहुल सोनवणे, पोना विनोद भोई, पोना दिपक पाटील, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील,पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ प्रविण जाधव, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ नंदकिशोर महाजन, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ पवन पाटील, पोकॉ शरद पाटील, पोकॉ उज्वलकुमार म्हस्के, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ अमोल भोसले, पोकॉ निलेश पाटील, पोकॉ प्रकाश पाटील, मपोकॉ सबा शेख यांचे पथक तयार करून आरोपी संतोष सुधाकर राठोड याचे तळेगाव तांडा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव याच्या राहते घरी छापा टाकून चेक केले असता, त्याचे राहते घराचे बाजुला गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल सह एकुण 36 मोटर सायकल एकूण 16 लाख 45 हजार रुपये किंमतीच्या मिळुन आल्या आहेत. सदर च्या मोटर सायकल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात येवून आरोपी संतोष सुधाकर राठोड यास अटक करण्यात आली आहे. गुन्हातील अटक आरोपी यांना मा. न्यायालयासमोर हजर करून त्यांची दि. 28 जून 2023 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, आरोपी संतोष राठोड हा लोकांना पैसे देवून मोटारसायकल गहाण ठेवतो. सदरचे मोटारसायकल ह्या त्यास कोणी दिल्या आहेत याबाबत पोलीस तपास करत असून,त्याच्यातील काही मोटारसायकल चोरीच्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तरी चाळीसगाव तालुक्यातील व्यक्तींनी संतोष राठोड याकडे मोटार सायकल गहाण ठेवली असल्यास, त्यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे कागदपत्र घेवून संपर्क करण्यास सांगण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या.
वरिल गुन्ह्याचा पुढील तपास ना. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरी. सुहास आव्हाड व पोकॉ उज्वलकुमार म्हस्के हे करीत आहेत.