अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पिंपरी : मर्सिडीजमधून आलेल्या इसमाने रिव्हॉल्वर दाखवून गहुंजेतील गृहसंस्थेत दहशत माजविली. अचानक बंदूक काढल्याने उपस्थित नागरिक सैरावैरा पळू लागले. याप्रकरणी चौघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली.
प्रदीप जयप्रकाश सिंग (रा. लोढा बेलमेंडा,गहुंजे,मावळ ,सोमनाथ शंकर ढेरे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, ता. हवेली), चंदनसिंग सुरेंद्र सिंग (वय ३२,रा. डांगे चौक,चिंचवड),अरमान कैलास बिडलान (वय २३, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आकाश सुखदेव ननावरे (वय २०, रा.’लोढा बेलमेंडो सोसायटी मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी 30 नोव्हेंबरच्या रात्री लोढा
बेलमेंडो सोसायटीत येऊन फिर्यादीचा मित्र प्रणव पुसावले याला धमकी देत होते. फिर्यादी चंदनसिंग यास त्यावरून समजावून सांगत होता, त्यावेळी चंदनसिंग याने प्रदीप सिंग यास फोनवरून बोलावून घेतले. त्यावेळी तो मर्सिडीज कारमधून आला. त्याच्यासोबत दुसऱ्या चारचाकी वाहनाने सात जण आले.सोबत आलेल्या व्यक्तींनी फिर्यादी आणि
त्याच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तर प्रदीपसिंगयाने बंदूक दाखवून दहशत निर्माण केली. त्यामुळे सोसायटीमधील रहिवासी सैरावैरा धावू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.