कुठल्याही अफवांना बळी पडू नका जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी
दि.30/04/2020 लॉकडाऊन मुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
पुणे दि 30: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. तथापि स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.सद्यस्थितीत कुठल्याही बसेस अथवा रेल्वे सुरु करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कामगार व नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. तसेच घराबाहेर न पडता आहे त्या ठिकाणीच सुरक्षित राहावे. जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची प्रशासनाच्या वतीने माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार करण्यात येणार आहे. हे कामगार ज्या राज्यात जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्या राज्याशी राज्य शासनामार्फत संपर्क साधून त्यांना संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतरनाची कार्यवाही सुरु केली जाईल. कामगारांच्या सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तक्रार असल्यास दुरध्वनी क्र.020-26111061 अथवा 020-26123371 अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com या इमेलवर तक्रारी स्विकारल्या जातील. याशिवाय तालुका नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating