केंद्र सरकारच्या ३ कृषी विधेयक कायद्यांना नरेंद्र मोदी टीम चा पाठिंबा

0 0
Read Time2 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दौंड शहरातील नरेंद्र मोदी टिम यांनी दि. २४ डिसेंबर वार गुरुवार रोजी केंद्र सरकारच्या ३ कृषी विधेयक कायद्यांना पाठिंबा देत दौंड शहराचे मा. तहसीलदार यांना तहसिल कार्यालयात जाऊन निवेदन दिले व नरेंद्र मोदी टिम यांनी या विधेयकाला पाठिंबा निवेदनाद्वारे दर्शवला. सध्या सर्वत्र ३ कृषी विधेयकाला विरोध दिसून येत असल्याचे स्पष्ट चित्र असतांना, नरेंद्र मोदी टिम पुणे जिल्हा अध्यक्ष अमर जोगदंड यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचे समर्थन करत ३ कृषी कायद्याच्या समर्थनार्थ तहसीलदार कार्यालय दौंड येथे निवेदन दिले. या निवेदनात विरोधक जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात आला असुन, नरेंद्र मोदी टिम या संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कायदा आहे असे पाठिंबा देत असल्याचे यात म्हटले आहे. यावेळी अमर जोगदंड नरेंद्र मोदी टिम, पुणे जिल्हा अध्यक्ष, सचिन कुलकर्णी नरेंद्र मोदी टिम, दौंड शहर अध्यक्ष, साईनाथ नायकर अध्यक्ष सोशल मिडिया, नरेंद्र मोदी टिम दौंड शहर, धनश्री पागे नरेंद्र मोदी टिम, शहर अध्यक्ष महिला आघाडी, शिल्पा शरद थिटे, प्रकाश पारदासानी, पांडुरंग गडेकर, विलास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.