अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी : विजय जाधव, दौंड(तालुका)
गेल्या तीन महिन्यापासून संपूर्ण भारतभर कोरोना मुळे लोक डाऊन असल्याकारणाने सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत त्यामध्ये शुभकार्याच्या मुहूर्तावर लॉक डाउन झाल्यामुळे मंडप -लाईट – साउंड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे व कामगारांचे सुद्धा उपासमार होत आहे .याच अनुषंगाने राज्य सरकारकडून व्यवसायिकांना व कामगाराना आर्थिक मदत व्हावी, व भांडवल गोळा करण्यासाठी किंवा मटेरियल ची ने-आण करण्यासाठी वाहन कर्ज घेतलेल्या कर्जाची मुदत वाढ होण्यासाठी बँकेकडून सहकारी पतसंस्था व फायनान्स यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची मुदत वाढ करून कोणत्याही प्रकारची टक्केवारी वाढवू नये.
त्याच प्रकारे जो भाग प्रतिबंधीत नाही किंवा जो ग्रामीण भाग आहे ज्या ठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव नाहीये अशा ठिकाणी शासनाच्या आदेशाप्रमाणे काही शुभ कार्य चालू आहेत. या शुभ कार्य साजरा करण्यासाठी काही लोकांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दोन-बेस- दोन- टॉप रितसर परमिशन मिळावी व शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटी चे पालन आम्ही सर्व व्यावसायिक पालन करणारच आहोत तरीसुद्धा पोलिस प्रशासनाने सुद्धा आम्हा सर्व व्यावसायिकांना सहकार्याची भावना दाखवावी ही विनंती जेणेकरून व्यावसायिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळेल व पुढील येणाऱ्या सार्वजनिक गणेश व नवरात्र उत्सवा मध्ये सुद्धा याच पद्धतीने सहकार्य मिळावे असेदेखील या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना दौंड शहर व तालुक्यातील मंडप -लाईट -साऊंड व जनरेटर मधील काही मालक उपस्थित होते.