Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरातील मंडप व्यावसायिकांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय कोलमडल्यामुळे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणीचे निवेदन

5 0
Read Time7 Minute, 57 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव दौंड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक डाऊन असताना सर्वत्र व्यवसाय बंद पडले आहेत सेवा उद्योग म्हणून काम करणाऱ्या व्यावसायिकांनी आर्थिक मदत करण्यात या साठी निवेदनात आपल्या बाजू मांडल्या आहेत . विषय : १)कोविड- १९ मुळे मंडप ,साउंड, लाईट सेवा उद्योग मध्ये मोडणाऱ्या व्यवसायिकांना आर्थिक मदत मिळणे बाबत ….
२) कोविड- १९ मूळे बंद असलेल्या व्यवसायामुळे व्यवसाय चालू करण्यासाठी घेतलेल्या सहकारी व सरकारी कर्जाचा EMI पुढे ढकलणे बाबत…..

सध्या देशात कोरोना विषाणू (कोविड-१९) राष्ट्रीय आपत्ती आलेले आहे त्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना राबवल्या जात आहेत राज्यात सातरोग अधिनियम 1897 च्या अनुषंगाने महाराष्ट्र गोविंद योजना नियम 2020 नियम लागू केले आहेत. याच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देशात गेली दोन-अडीच महिन्यापासून लोक डाऊन असल्याने सेवा उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेवा उद्योगात मोडणारे मंडप साउंड लाईट डेकोरेशन असे व्यावसायिक सेवा उद्योग करून आमची उपजीविका भागवणारे सध्या आमच्यावर लॉक डाऊनलोड मूळे पूर्ण सीजन बंद ठेवावा लागला आहे.

हा व्यवसाय सुखात आणि दुःखात लोकांना सेवा देणारा आहे जन्मलेल्या बाळापासून ते अंत्यविधी पर्यंत आपल्या सेवेत कटिबद्ध असतो. मार्च- एप्रिल- मे महिन्यात सर्वात जास्त मुहूर्त असणारे लॉक डाऊन मध्ये पूर्ण बंद झाले याच महिन्याच्या सीझनमध्ये प्रत्येक व्यावसायिकाने पत संस्थेच्या मार्फत फाईनसच्या मार्फत तसेच बँकांच्या मार्फत आपल्या व्यवसायासाठी भांडवल म्हणून कर्ज घेतलेले आहेत. या काळात वस्तू लागणार आहे म्हणून नवीन वस्तूची किंव्हा माल-वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनाची खरेदी केलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न पडलाय की सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन तर आम्ही करत आहोत. आणि सरकारने दिलेल्या आदेशाचे तीन महिन्यानंतर आपले हप्ते EMI घेतले जातील. अशी देखील घोषणा केलेली आहे.

परंतु आम्ही सिजनेबल सेवा उद्योग करणारे मार्च – एप्रिल -मे गेल्यानंतर जून -जुलै -ऑगस्ट सप्टेंबर यामध्ये पावसाळा येतो. आणि यामध्ये कोणतेही शुभ कार्य होत नाही. आणि येणारा गणपती आणि नवरात्र उत्सव हेदेखील उत्सव सरकारच्या आदेशानेच म्हणजेच कमी गर्दी होईल या हिशोबाने पद्धतीने करणार आहोत. म्हणजेच आम्हा सर्व व्यवसायिकांना साधारण जानेवारी 2021 पर्यंत कोणतीही ऑर्डर योग्य पद्धतीने मिळणार नाही. मग आम्हाला हा प्रश्न पडलाय की सरकारने तर फक्त तीन महिने EMIपुढे ढकलला आहे. मग उरलेली पुढील डिसेंबर महिनेपर्यंत आम्ही कोणत्या स्वरूपात EMI भरणार, म्हणून EMI सुद्धा डिसेंबर 2020 महिन्या नंतरच घेतला जावो. व कोणत्याही पद्धतीची टक्केवारी वाढू नये. हा झाला भांडवल गोळा करण्यासाठी बँकेतून किंवा पत संस्थेमार्फत फायनान्स मार्फत घेतलेल्या कर्जाबाबत बाबत…….

याच कर्जाचा एक भाग म्हणजे पुणे येथील मंडप व्यावसायिकाने व्यवसाय ( ठप्प )बंद झाल्यानंतर गेल्या महिन्यात सहाव्या मजल्यावरून आत्महत्या केली. कर्जाचं ओझं डोक्यावर असल्याने व व्यवसायातून चलन न फिरल्याने व्यक्तीने आत्महत्या केली असं बोललं जातंय. म्हणून याचबरोबर सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे कुटुंबाचा आणि त्यातलाच एक भाग म्हणजे व्यवसायाची काठी असलेल्या बेरोजगार मजुरांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा भविष्यात ही स्थिती कधी बदलेल सांगता येत नाही परंतु डिसेंबर अखेरपर्यंत या सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना कोणतेच काम नाहीये मग आम्ही आमचे कुटुंब आणि मजुरांचे कुटुंब कोणत्या पद्धतीने उदार निर्वाह करणार आणि याच बरोबर आमच्या व्यवसायाशी निगडित असणारे जनसेट वाले, ( आचारी )केटरिंग वाले, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफर तसेच बँड वाले फुल डेकोरेशन यांना देखील याच पद्धतीने सामोरे जावे लागणार आहे.

या पुढच्या काळात ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन नाही. किंवा ग्रामीण भागात त्या ठिकाणी काही शुभकार्य चालू असत. त्यांचा एक आनंद असतो उत्साह असतो की साऊंड लावून तो आनंद व्यक्त करतात त्याच्या साठी निदान दोन बेस दोन टॉप लावण्याची परवानगी रीतसर शुभ कार्य असणाऱ्या पार्टीला पोलीस स्टेशन मधून परमिशन मिळावी.येणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्साह नवरात्र उत्साह या साठी सुद्धा दोन बेस दोन टॉप साठी पपरमिशन मिळावी कारण प्रत्येक वेळेस साऊंड लावल्यानंतर पोलीस प्रशासन सर्वात प्रथम फक्त साऊंड वाल्यांवरच कारवाई केली जाते. त्या पासून पण दिलासा मिळाला.

व यापुढच्या काळात कोरोना परिस्थिती अशाच पद्धतीने राहिली तर आम्हा सर्व व्यवसायीकाना चालना मिळणार नाही व त्यातून व्यवसायिक आत्महत्येस प्रवृत्त होतील.

म्हणून आपणास विनंती करत आहोत कि, भविष्यात होणाऱ्या अडचणी संदर्भात आम्हा सर्व सेवा उद्योग देणाऱ्या व्यावसायिकांना आमच्या कुटुंबासाठी व मजुरांच्या कुटुंबासाठी योग्य ती शासन स्थरावर आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी ही विनंती.

असे या निवेदनात म्हटले आहे व आज हे निवेदन दौंड मधील मंडप व्यवसाय कडून तहसीलदारांना देण्यात आले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: