कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Read Time2 Minute, 40 Second

पुणे: पुणे जिल्ह्यासाठी कोरोना विषाणूमुळे असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेला मुबलक अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बाळासाहेब देशमुख यांची जीवनाश्यक वस्तू पुरवठा कक्षाचे विशेष कार्य अधिकारी तसेच मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के आणि सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक अशोक कुंभार यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत कोणताही व्यक्ती उपाशी राहणार नाही तसेच समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेळेत जीवनावश्यक वस्तू पोहचणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यानुसार विशेष कार्यकारी अधिकारी यांनी स्वनिधीतून धान्याची खरेदी करुन वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री राम यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील उप विभागीय अधिकारी हवेली, पुणे शहर, खेड व मावळ कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या हवेली आणि पुणे शहर तालुक्याकरीता 200 टन तांदूळ, 200 टन गहू, 40 टन तूरदाळ व वीस हजार लिटर तेल तसेच मावळ आणि खेड तालुक्याकरीता 100 टन तांदूळ, 100 टन गहू, 20 टन तूरदाळ व दहा हजार लिटर तेल या जीवनाश्यक वस्तुंची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदविण्यात आल्याची माहिती इंन्सिडेंट कमांडर व समन्वय अधिकारी तथा मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post माननिय जिल्हाधिकारी,पुणे यांच्या आदेशानुसार दौंड आणि पुरंदरचे प्रांत अधिकारी मा.प्रमोद गायकवाड, आणि दौंडचे तहसीलदार मा.संजय पाटील,यानी केलेल्या आवाहानानुसार मदत तहसील कार्यालयात जमा
Next post NRMU या रेल्वेच्या संघटनेकडुन रेल्वे हॉस्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज वाटप
error: Content is protected !!
%d bloggers like this: