अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
जळगाव – मतदार संघातून दरवर्षी हजारोच्या संख्येने पंढरपूर येथील आषाडी यात्रेसाठी भाविक जात असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना चे सावट असल्याने श्री. क्षेत्र पंढरपूर येथे भाविकांना यात्रेसाठी जाता आले नाही.
यंदा माञ यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा उत्साह अधिक असणार आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त आषाढी स्पेशल गाड्या सुरू कराव्यात. या गाड्यांना लोकसभा मतदारसंघात जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे अधिक वेळ थांबा देण्यात यावेत. जेणेकरून जेष्ठ नागरीक भाविकांची गैरसोय होणार नाही. अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने खान्देशातील वारकरी भाविकांसाठी आषाडी एकादशी स्पेशल चार गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी या माफक दरात वारीचा आनंद घ्यावा. असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.
आज रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून यात जळगाव पाचोरा व चाळीसगाव येथून भाविकांना जनरल तिकीट घेऊन पंढरपूर येथे जाता येणार आहे.
मागणीला यश
गेल्या २८ मे रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विन वैष्णव यांचेकडे लेखी मागणी करीत पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. ना.रावसाहेब दानवे पाटील साहेब यांना भेटून आषाडी एकादशी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
गाड्यांचा असे असेल वेळापत्रक
आषाढी एकादशी निमित्त या नवीन गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.
नागपूर मिरज एक्सप्रेस
गाडी क्रमांक – 01115 ही गाडी 6 व 9 जुलै रोजी जळगाव येथे 4: 40 मिनिटांनी चाळीसगाव येथे 5:50 पन्नास मिनिटांनी..
नवी( अमरावती) पंढरपूर नावी (अमरावती ) एक्सप्रेस
गाडी क्रमांक – 01119
6 व 9 जुलै रोजी जळगाव येथे
07: 40 मिनिटांनी, पाचोरा येथे 08:15, चाळीसगाव येथे 09: 07 मिनिटांनी.
.खामगाव पंढरपूर एक्सप्रेस
गाडी क्रमांक – 01121
7 व 10 जुलै रोजी जळगाव येथे
02: 05 मिनिटांनी, पाचोरा येथे 02:30, चाळीसगाव येथे 03: 17 मिनिटांनी..
नागपूर पंढरपूर नागपूर एक्सप्रेस
गाडी क्रमांक – 01117
7 व 10 जुलै रोजी जळगाव येथे
04: 43 मिनिटांनी, चाळीसगाव येथे 05: 52 मिनिटांनी सुटणार आहेत.
या स्पेशल ट्रेन मधून वारीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.