खामगावातील कामगारांवर झालेल्या हल्ल्यात एक ठार,एक गंभीर जखमी.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-दि.३१ मार्च २०२३ फिर्यादी कुणाल सदाशिव कवडे (वय-३०,व्यवसाय-दुग्ध व्यवसाय,रा-खामगाव,ता-दौंड,जि-पुणे)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,आरोपी-पिंटू अशोक गायकवाड(पत्ता माहित नाही)याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात खुनाचा व खुन करण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी यांच्या गोठ्यावरील कामगार (१)मुकेश उर्फ मुक्तार यादव ( वय-४५,रा-धरमपुर,जि-गाझीपुर,उत्तर प्रदेश.)याचा,आरोपी पिंटु अशोक गायकवाड ,याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळा चिरून खून केला,तर(२)रामकुंवर यादव(वय-४४,रा-डिग्गी,जि-चंदोली,उत्तर प्रदेश.) याच्यावरही धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर आरोपी पिंटू अशोक गायकवाड हा फरार असून यवत पोलीस याचा कसून शोध घेत आहेत. आरोपीचे या दोघांवर हल्ला करण्याचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे सपोनि लोखंडे करत आहेत.