अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
पारोळा — गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पारोळा तालुक्यातील सावरखेडा , शिवरे परिसरातील शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत होता. एकीकडे भरपूर पाणी असताना दुसरीकडे डी पी जळाल्याने वीज समस्या निर्माण झाली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे कडे आपली कैफियत मांडली होती. खासदार उन्मेश यांनी तातडीने पाचोरा उप विभाग अधिकाऱ्यांना सूचना देत दोन दिवसांत रोहित्र (डी पी) बसवण्याचे आदेश दिले होते. अखेर आज हे रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून खासदार उन्मेश पाटील यांचे आभार मानले आहेत.
याबाबत माहिती अशी की पारोळा तालुक्यातील सावरखेडा , शिवरे परिसरातील शेतकऱ्यांना शेती साठी विज पुरवठा देणारे रोहित्र (डी पी ) जळाल्याने वीज समस्या निर्माण झाली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील विज वितरण कंपनी कडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील शेतकरी भाऊसाहेब पाटील, प्रवीण पाटील,संभाजी पाटील, नाना चींधा पाटील, तुकाराम शीवरे, बापू पाटील,सागर कुमावत, दीपक पाटील यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याशी संवाद साधून आम्हाला शेतीसाठी विज पुरवठा देणारी डी पी बसवण्याची विनंती केली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाचोरा उपविभाग अधिकारी शिरसाठ साहेब यांना तातडीने दखल घेत डी पी बसवण्याचे सूचना केली होती. आज अखेर हे रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.