अधिकार आमचा न्यूज
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील घाटरोड कोळीवाडा परिसरात घरातून होत होती गांजा विक्री गांज्या सोबत विक्री करणाऱ्यांना अटक शहर पोलिसांची कामगिरी शहरात के के पाटील पोलीस निरीक्षक पदी रुजू झाल्या पासून शहरात अवैध धंदे धारकांचे धाबे दणाणले असून सर्वत्र शांतता आहे.
मात्र मिळालेल्या गुप्त महितीनुसार शहरातील घाट रोड कोळीवाडा येथे गांज्या विक्री होत असल्याचे कळल्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी आरोपींच्या घरात छापा टाकत 1लाख 66 हजार 620 रु किमतीचा 11 किलो गांजा,58 हजार 770 रु रोख रक्कम,छोटा इलेक्ट्रॉनिक काटा,स्टेपलर, पॅकिंग साठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पाऊच आदी मिळून आले असून गांज्या,रोख रक्कम व मिळून आलेल्या सर्व साहित्याची एकूण रक्कम 2 लाख 25 हजार 855 रु असून महिले सह राकेश भिकन चौधरी वर एन.डी.पी.एस ऍक्ट 1985 चे कलम 8(क),20(ब),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कारवाई पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार महसूल विकास प्रल्हाद लाडवंजारी, सपोनि/विशाल टकले, स.पो.नि. विष्णु आव्हाड, स.पो.नि. सागर ढिकले, स.पो.नि. सचिन कापडणीस, पोउनि. अमोल पवार, हवालदार अभिमन महादु पाटील, पोना भगवान अजब उमाळे, सुभाष रमेश घोडेस्वार, दिपक प्रभाकर पाटील, विनोद विठ्ठल भोई, कॉन्स्टेबल विनोद तुकाराम खैरनार, निलेश हिरालाल पाटील, सबा शेख, नितीन गंगाराम वाल्हे, महेश अरविंद बागुल तसेच फोटोग्राफर अनिकेत चंद्रशेखर जाधव, वजन मापाडी तुकाराम रघुनाथ पाटील यांचा समावेश असणार्या पथकाने केली आहे. या संदर्भातील पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक सागर ढिकले हे करीत आहेत.