गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी “पोलिसांसाठी एक कॅमेरा ” उपक्रमात सहभागी व्हा-पोलीस निरीक्षक संदिप पाटील

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात विविध प्रकारच्या गुन्ह्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून आपले कर्तव्य कर्तव्यनिष्ठपणे पार पाडत “पोलिसांसाठी एक कॅमेरा ” उपक्रमा अंतर्गत समाजात जनजागृती देखील करत आहेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील
चाळीसगाव शहरा मधील नागरिकांशी सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवर्य नगर येथे नागरिकांसोबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी नागरिकांना घरफोडी चोरी , चैन स्नॅचिंग , मोटर सायकल /कार चोरी ,ऑनलाईन द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच कॉलनीत सुरक्षेसाठी नागरिकांनी सी सी टीव्ही कॅमेरे परिसरात लावण्या बाबत ” पोलिसांसाठी एक कॅमेरा ” या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच सी सी टीव्ही कॅमेरे सदर कॉलनी परिसरात नागरिकांकडून लागणार …”असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले सोबतच शहरवासीयांना देखील उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सदर चर्चेस श्री संजय देशमुख , श्री प्रकाशराव गायकवाड , श्रीअनंतसिंग पवार ,श्री सुभाषराव ठोके ,श्री अनिलराव देशमुख ,श्री नंदकुमार देशमुख ,श्री धनंजय गोटे ,श्री पुरुशोत्तम देशमुख ,श्री निबर्जी देशमुख ,श्री अनंतराव शितोळे ,श्री प्रशांत शिंदे सुधीर कुंभारे ,श्री सुरेखा देशमुख ,श्री मनोज देशमुख ,श्री सुनील गावडे ,श्रीदिलीपराव देशमुख इ . कॉलनी रहिवासी हजर होते.