गौतम कांबळे यांची शिक्षक संघटना समन्वय समितीच्या
” राज्यमहासचिव ” पदी निवड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-गौतम कांबळे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या ” राज्यमहासचिव ” पदी निवड करण्यात आली आहे .याबाबतची माहिती समन्वय समितीचे राजाध्यक्ष अरुण जाधव व राज्य समन्वयक प्रकाश घोळवे यांनी दिली .गौतम कांबळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत .ते सध्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ व मुलनिवासी शिक्षक संघ या संघटनांचे राज्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत .नेहमीच शिक्षकांच्या विविध समस्यांसाठी अग्रेसर असणारे गौतम कांबळे यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना हे पद मिळाले आहे व आजून ताकतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये राज्यातील 38 शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी आहेत गौतम कांबळे यांच्या निवडीबद्दल राज्यातील शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे व गौतम कांबळे याच्यावर सर्व स्थरावरून मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे