अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
दिनांक 17/06/2020 रोजी गुप्त बातमीदाराने खात्रीशीर दिलेल्या बातमी नुसार चाळीसगाव शहर पो.स्टे. मा. पोलीस निरीक्षक श्री. विजयकुमार ठाकुरवाड, नायब तहसिलदार श्री. विशाल सोनवणे, तहसिल कार्यालय, चाळीसगाव, श्री. कैलास गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव भाग, चाळीसगांव, स.पो.नि. मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक विजय साठे, पोहेकॉ/2058 गणेश वसंत पाटील, पोना/1326 पंकज पंढरीनाथ पाटील, पोना/2897 विनोद विठ्ठल भोई, पो.ना. 1119 सुभाष रमेश घोडेस्वार, पो.ना. 2879 पंढरीनाथ पवार, पोना/2961 प्रविण किशोर संगीले, पो.कॉ. 3105 तुकाराम चव्हाण, पो. कॉ. 2804 प्रविण भिमराव सपकाळे, पो.कॉ. 2233 निलेश हिरालाल पाटील, पोकॉ/1002 राकेश सुरेश पाटील, पो. कॉ.1885 संदिप किसन भोई, मपोकॉ/2346 सोनी अकबर तडवी सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच पो.ना. 343 महेंद्र श्रीराम साळुंखे नेम.चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे. व इतर अशांनी दोन पंचासमक्ष चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील नागदरोड, झोपडपट्टी येथे राहणारा इसम नामे सलीम अली याचे राहते घरी सापळा रचुन छापा टाकला. त्यावेळी आरोपीतांकडे एकुण 16,66,510/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्या मध्ये 6,510 रुपये किमतीचा 2 किलो 170 ग्रँम गांजा व 16,55000/- रुपये रोख रक्कम तसेच 5000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन मिळुन आले आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे 1) सलीम अली अश्रफ अली वय 35 वर्षे व 2) नसीमबी अश्रफअली वय 55 वर्षे दोन्ही रा. झोपडपट्टी, नव्या पाण्याच्या टाकीजवळ, घाटरोड, चाळीसगांव यांना आज दिनांक 18/06/2020 रोजी 14.46 वाजता रितसर अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार ठाकुरवाड यांच्या आदेशान्वये श्री मयुर भामरे, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.