अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव – शहरातील कॅप्टन कॉर्नर जवळील समर्थ हॉस्पिटल च्या मेडीकल चे शटरची पट्टी कटर ने तोडून आतील रोख रक्कम चोरी केल्याची घटना दि 11 रोजी रात्री अडीच ते 3 वाजेच्या सुमारास घडली दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न सुरू असताना एकाने पोलिसांना फोन केल्यावर पोलिसांनी शोध घेऊन संशयित इंडिका वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केल्यावर चोरटे वाहन सोडून पळून गेले आहे मात्र चोरीचे साहित्य सोडून गेले हा थरार अगदी सिनेस्टाईल झाल्याने पोलिसांच्या धाडसाचे अप्पर पोलीस अधीक्षक, सचिन गोरे, डी वाय एस पी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी कौतुक केले आहे.
शहरातील एका ठिकाणी दुकानात चोरी होत असल्याचा आवाज येताच एकाने पोलीस स्टेशनला रात्री फोन केल्यावर ठाणे अंमलदार भगवान उमाळे यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व वरिष्ठांना आणि गस्तीवर असलेल्या सहाय्यक फौजदार प्रकाश महाजन, पोलीस नाईक संदीप पाटील, होमगार्ड अनिकेत जाधव यांना दिल्यावर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केल्यावर भडगाव रोडवर पांढऱ्या रंगाचे इंडिका क्र MH 30 P 1789 ही संशयास्पद रित्या भरधाव वेगाने घाटारोड कडे जाताना दिसल्यावर त्यांनी पाठलाग केला मात्र वाहन नागद रोड कडे गेल्यावर महाजन यांनी सिनेस्टाईल हातातील काठी इंडिका ला मारून काच फुटली आपला पाठलाग होत असल्याचे समजून आल्याने व आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी हळू करून वाघडू शिवारात चोरीचे हत्यारे सोडून पलायन केले त्याठिकाणी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे पोलीस ताफ्यासह पोहोचले व पोलिसांनी रात्रभर शोध घेतला असता चोरटे मिळून आले नाही इंडिका चा शोध घेतल्यावर इंडिका गाडी ही आडूळ बु ता पाचोड जिल्हा औरंगाबाद येथील असून औरंगाबाद येथून 3 दिवसांपूर्वी चोरी गेल्याचे समजले आहे याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.