(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)
चाळीसगांव प्रतिनिधी
चाळीसगांव येथे काही दिवसापूर्वी नांदगाव तालुक्यातील 55 वर्षीय रुग्ण करगाव रोड वरील दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला होता त्या रुग्णास पुढील उपचारासाठी नाशिक पाठविण्यात आले होते नाशिक येथे त्याची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याने चाळीसगाव येथील दवाखान्यातील डॉक्टर,कर्मचारी व इतर रुग्ण जवळपास 20 लोकांचे नमुने तपासणी साठी धुळे येथे पाठविण्यात आले होते ते नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डी डी लांडे यांनी दिली
चाळीसगावकरांनी सुटकेचा स्वास घेतला आपल्या तालुक्याच्या आजू बाजूला कोरोना वाढत आहे आपण खबरदारी घेणे हाच एक उपाय आहे कोरोनाशी लढण्याचा आता पर्यंत तालुक्यात रुग्ण मिळाले नाही यात लोक प्रतिनिधी, पोलीस, प्रशासन, व सामाजिक कार्यकर्ते यांचे मोठे योगदान आहे
घाबरू नका घरात रहा,सुरक्षित रहा
काळजी घ्या