अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्नाना रक्ताचा महाराष्ट्रात तुटवडा जाणवत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले होते . त्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव येथील मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने शहरातील स्टेशन रोड वरील गुड शेफर्ड इग्लिश् मेडीयम जवळ दि २७ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात जवळपास १८ ते २० बाटल स्वइच्छेने नागरिकांनी रक्तदान केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ,संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्दनंतर रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली.जीवन सुरभी ब्लड बॅंकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. कार्यक्रमास गणेश पवार , राजेंद्र शिंदे ,भैय्यासाहेब पाटील, खुशाल पाटील,किशोर पाटील,जालींदर पठाडे,स्पन्निल राखुंडे , गोरख साळुंखे,सुधीर पाटील ,प्रदीप मराठे ,तमाल देशमुख,सतीश पवार,बाळु पवार,शांताराम पाटील,सचिन ठाकरे,ईश्वर पवार, महेश शेलार ,योगेश जाधव,निवृत्ती कवडे अदि उपस्थित होते .शिबीराचे आयोजन अनिल पाटील,सचिन पाटील,
ॲड माणिक शेलार,चेतन देशमुख,ललित पाटील,पंकज पाटील,निलेश पाटील,प्रशांत पाटील यांनी केले होते.