अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव – शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. यात शहरात असलेल्या कोव्हीड सेंटरला उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना रेडमिसीअर इंजेक्शन तसेच फेबिफ्ल्यू गोळ्यांची पुर्तता करण्यात यावी यासाठी लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेत कोरोना विषाणूच्या उपचाराकामी निवेदन देत साकडे घातले.
राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी तात्काळ याकामी माहीती घेत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधत महाराष्ट्र राज्याच्या सचिव अर्चना पाटील यांच्याशी संवाद साधत रेडमिसीअर इंजेक्शन व फेबिफ्लू औषधींचा पुरवठा करण्याबाबत सुचना दिल्यात. याप्रसंगी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष शाम देशमुख, भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, दिपक पाटील, सुर्यकांत ठाकूर, जगदीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते दिपक कच्छवा आदी उपस्थित होते.