चाळीसगाव तुरळक पाऊस प्रभाग क्र 8 मध्ये रस्त्यांवर चिखल…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 2 जुलै शहरात झालेल्या तुरळक पावसामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये रस्त्यांवर झाला गाराच गारा प्रभागातील नागरिकांची विकासकामांसाठी खंदलेले रस्ते पूर्ववत करण्याची मागणी.
शहरात सकाळी 11 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास तुरळक असा पाऊस आला मात्र प्रभाग क्र 8 मध्ये चिखल करून गेला जर तुरळक पावसात ही परिस्थिती होत आहे तर जोरदार पाऊस आल्यास नागरिकांना घराच्या बाहेर येणे सुद्धा शक्य होईल की नाही याबाबत नागरिक चिंता व्यक्त करत असून विकासकामांसाठी रस्ते
खोदन्यात आले पण योग्य प्रकारे खोदलेले रस्ते पूर्वीसारखे व्यवस्थित न केल्याने नाहक स्थानीक नागरिकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोशल मीडियावर स्थानिक नागरिकाने टाकलेला मेसेज
खुप वेदना दाई परिस्थिती आहे हे सत्य नाकारता येत नाही भाऊ आपण सर्व प्रभाग क्रमांक 8 मधील रहिवासी असून ज्या कामासाठी हे रस्ते खोदकाम केले आहे कमित कमी जे झाले आहे ते तरी व्यवस्थित करुन कुपया जनतेवर उपकार करावे हिच नम्र विनंती.
किरण आढाव (अध्यक्ष रेल्वे प्रवासी समिती)
रहिवासी प्रभाग क्रमांक 8 चाळीसगांव
या चिखला मुळे एका बाबा व नातू गाडी स्लिप झाल्याने जयहिंद शाळे जवळ जोरात पडले पण सुदैवाने दोन्हींना दुखापत झाली नाही मात्र भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तरी नगरपालिका प्रशासनाणे मोठा अपघात होण्याची वाट न पाहता त्वरित काही उपाय योजना करण्याची मागणी स्थानिक करत आहे. संपूर्ण शहरात मागील वर्षी याच प्रकारे चिखल चिखल झालेला होता यावर्षी वाटत होते परिस्थिती काही सुधारेल मात्र झालेल्या तुरळक पावसाने काहीतरी उपाययोजना लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने कराव्या असे संकेतच दिले आहेत अन्यथा शहराची परिस्थिती मागील वर्षा सारखीच होणार यात शंका नाही.