अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 10 सप्टेंबर 2020 गुरुवार रोजी मलनिरस्सारण प्रकल्पाची कामे लवकरात लवकर करावी व रस्त्यांची कामे सुरू करावी असे निवेदन नगरसेवक शेख चिरागुद्दीन रफिक शेख यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना सोशल डिस्टन्स चे पालन करत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जो पर्यंत मलनिरस्सारण प्रकल्पाची कामे होत नाही तो पर्यंत रस्त्यांची कामे होणार नाही तरी मलनिरस्सारण प्रकल्पाचे थांबलेले कार्य लवकरात लवकर सुरू व्हावे जेणे करून नागरिकांना खराब रस्त्यांमुळे होणार मनस्ताप कमी होईल,पाईप लाईन साठी करण्यात आलेल्या खड्ड्यययांमुळे संपूर्ण शहर विद्रुप झाले आहे तरी काम सुरू करावे जर थांबलेले कार्य लवकरात लवकर सुरू केले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याचे नगरसेवक शेख यांनी सांगितले सदर निवेदनाच्या प्रत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,जळगाव जिल्हाधिकारी,चाळीसगाव तहसीलदार,नगरपालिका मुख्याधिकारी,शहर पोलीस स्टेशन आदी कार्यालयात देण्यात आल्या यावेळी नगरसेवक शेख यांच्या सह,सामाजिक कार्यकर्ते बबन पवार,नगरसेवक बापू आहिरे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.