प्रतिनिधी(चाळीसगाव): चाळीसगाव वाहतूक शाखेचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब किर्तिकर साहेब रुजू होताच सुरू केले आपले कार्य संपूर्ण शहराचा आढावा घेऊन एच डी एफ सी बँक,स्टेट बँक ऑफ इंडिया या महत्वाच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये खातेदारकांची वर्दळ असते व खातेधारक आपले वाहन बँकांच्या बाहेर लावतात त्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो त्या मुळे या बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना भेटून खातेधारकांच्या वाहनांची व्यवस्थित व्यवस्था करावी जेणे करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच चाळीसगांव कोर्टा समोर रस्त्यात असलेला इलेक्ट्रॉनिक पोल आहे हा ही वाहतुकीस अडथळा निर्माण करतो व या मुळे मोठा अपघात होऊ शकतो तरी त्वरित या पोल ची व्यवस्था करावी असे पत्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ चाळीसगाव कार्यालयात देण्यात आले आहे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची महत्वाच्या ठिकाणी असलेल्या सर्व गॅरेज व दुकाने सर्वांना पत्र देणार व वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या साठी सहकार्य करावे असे आव्हान करणार आहे व चाळीसगांव येथील नागरिकांच्या वाहतुकी संबंधीत समस्यांना सोडविण्यासाठी नेहमी कटिबद्ध असल्याचे ही सांगितले.
Read Time2 Minute, 6 Second