छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसृष्टीवर डौलाने फडकला भगवा रयत सेनेच्या मागणीला यश….

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
न पा मुख्याधिकारी यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भगवा ध्वज उभारण्याच्या रयत सेनेच्या मागणीला यश….
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या अनेक दशकापासुन असलेल्या मागणीला यश येवून अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आल्याने शहर व तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदउत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र पुतळ्याच्या बाजूला असलेल्या शिवसृष्टीवर भगवाध्वज पत्र्याचा बसविल्याने शिवप्रेमीं मध्ये नाराजी होती. पत्र्याचा ध्वज ऐवजी भगवा कापड असलेला ध्वज उभारावा अशी मागणी निवेदनाद्वारे चाळीसगाव न पा मुख्याधिकारी यांच्या कडे रयत सेनेच्या वतीने गणेशभाऊ पवार व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दि १७ ऑक्टोबर २०२२ रोजी केली होती. त्या मागणीला यश आले असून नगरापालिका ने त्याठीकाणी शिवजयंती पूर्वी शिवसुष्टी वर भगवाध्वज बसविला आहे.रयत सेनेने केलेल्या मागणीला यश आल्याने शिवप्रेमी व रयत सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांचे रयत सेनेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहे