जगातील बहुसंख्य क्रांतिकारक संघटना या छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच प्रेरणा घेऊनच घडल्या-व्याख्याते शशिन कुंभोजकर

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)दि.५ जून २०२३ छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे ऊर्जा स्रोत नसून संपूर्ण भारताचे व जगाचे ऊर्जा स्रोत आहेत.भारतातील व जगातील बहुसंख्य क्रांतिकारक संघटना या छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच प्रेरणा घेऊनच घडल्या आहेत,असे प्रतिपादन कोल्हापुर येथील प्रसिद्ध व्याख्याते शशिन कुंभोजकर यांनी केले.
आज ज्येष्ठ पौर्णिमा निमित्त दत्तपीठ दत्त मंदिरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका तसेच श्री दत्तपीठ दत्त मंदिर दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्तपीठ दत्त मंदिर सिद्धटेक रोड येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. व शालीमार चौक भजनी मंडळाने भजन संध्या सेवा केली सागर कोल्ड्रिंक्स तर्फे सरबत वाटप करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची सजावट वीरभद्र ढोल ताशा पथक विठ्ठल मंदिर परिसर हया युवक मुलाने केली..
अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अँड पांडुरंग जगताप,सरचिटणीस विक्रम बाबा पवार,तालुका अध्यक्ष दादासाहेब नांदखिले,शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ थोरात,सचिन कुलथे , नगरसेविका आरूणाताई डहाळे,संतोष जाधव, विनय लोटके, मोहन नारंग, उमेश वीर, तसेच बहुसंख्येने श्रोते उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा सत्कार दत्त पीठ मंदिराच्या वतीने दत्तात्रयबुवा सावंत, ज्येष्ठ विधीतज्ञ विलास बर्वे, नीलेश सावंत, नरेंद्र सावंत, सुधीर साने, उमेश शितोळे मनोज सावंत यांनी केला. प्रास्ताविक प्रसाद गायकवाड यांनी केले सुत्रसंचलन श्रीसुधीर साने यांनी केले तर आभार निलेश सावंत यांनी मानले.
दत्तगुरूची महाआरती श्री व सौ मनीषा नितीन ओसवाल, श्री व सौ संगीता प्रसाद गायकवाड, श्री व सौ दिपाली प्रदीप माने , या परिवरच्या वतीने संपन्न झाली महाप्रसादाचे पंगत श्री मयूर ओझा, मयूर खोसे, प्रमोद शेळके, कु.स्वामिनी खानविलकर या परिवाराचा वतीने देण्यात आली व महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.