जळगांव जिल्ह्यातून चाळीसगाव शहरातील चौघे 2 वर्षांसाठी हद्दपार,पोलीस अधीक्षकांची कारवाई…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात टोळीने गुन्हे करणारे चौघांना पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्ह्यातुन 2 वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत हद्दपार करण्यात आलेल्या १) भुपेश ऊर्फ भुप्या यशवंत सानेवणे वय २३ रा भडगांव रोड आर. के. लॉन्स जवळ चाळीसगांव २) अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार वय १९ रा प्लॉट एरीया चाळीसगांव ३) धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले वय २५ रा स्वामी समर्थनगर चाळीसगांव ४) चोंग्या उर्फ तुषार महेंद्र जाधव वय २६ रा. नारायणवाडी पेट्रोल पंप जवळ चाळीसगावं यांचे विरुध्द चाळीसगाव शहर पो.स्टे. ला एकूण १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
टोळीने राहुन चाळीसगावं शहरात ठिक ठिकाणी चौघे दहशत पसरवित होते सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता. त्यांना जळगाव जिल्ह्यात शांतता ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नव्हती. त्यांचे विरुध्द गुन्हे १८ गंभीर गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने सदरचा हद्दपार प्रस्ताव हा रमेश चोपडे,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगावं परिमंडळ व अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगांव भाग यांच्या मार्गदर्शना खाली चाळीसगांव शहर पो. स्टे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.हे.कॉ.विनोद विठ्ठल भोई, पोना तुकाराम जुलालसिंग चव्हाण, पो.कॉ. चतरसिंग राजेंद्र महेर, मपोकॉ सबा शेख यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.
श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती चौघांना 2 वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफी / युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.