अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलीक
जळगाव(वृत्तसेवा)-आज जळगांव येथे माहिती अधिकार महासंघाची मिटिंग घेण्यात आली या वेळी जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी विडिओ मिटिंग द्वारे मार्गदर्शन केले, यावेळी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या व भ्रष्टाचार कसा थांबविता येईल अश्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली सोबत माहिती अधिकार महासंघात केलेल्या कार्याची पावती म्हणून जिल्हा अध्यक्ष पदी आरिफ पटेल,जिल्ह्या उपाध्यक्ष पदी अमोल कोल्हे व जिल्हा कार्याध्यक्ष पदी अर्जुन असाने यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी दिले असून कार्यकर्त्यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार केला व जळगाव जिल्ह्या भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प केला आहे या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे व लवकरच महासंघाच्या या वृक्षचे वटवृक्ष करणार असल्याची ग्वाही नव नियुक्त पदाधिकारी यांनी दिली.