अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष व गुन्हे उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा श्वान ‘जंजीर’ याचा सेवानिवृत्ती सोहळा सन्मानपूर्वक पार पडला. हा कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
श्वान पथकाचे प्रभारी पो. उपनिरीक्षक देविदास वाघ, श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे व पोहेकॉ संदिप परदेसी यांची उपस्थिती होती.
जंजीर चा जन्म : 18 नोव्हेंबर 2017 रोजी झाला होता तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे 9 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, 7 एप्रिल 2018 रोजी जळगाव पोलिस दलात जंजीरची नेमणूक करण्यात आली.
गत 7 वर्षांच्या सेवेत, जंजीरने चाळीसगाव, MIDC, भुसावळ शहर पोलिस स्टेशन सह अनेक ठिकाणी गुन्हे उकलण्यात महत्त्वाची मदत केली. आरोपींचे ठसे ओळखणे, मार्ग शोधणे, गुन्हेगारांचा माग काढणे अशा कामगिरीत त्याने पोलिसांना मोठी साथ दिली.
पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी जंजीरचा सत्कार करून त्याच्या उत्कृष्ट योगदानाची प्रशंसा केली. गुन्हे तपासात मोलाची मदत करणारा हा श्वान दलासाठी प्रेरणादायी ठरल्याचे अधिकारी म्हणाले.
