एरंडोल:जागतिक शौचालय दिनाच्यानिमित्ताने दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर तालुका एरंडोल याठिकाणी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांचे पुढाकाराने शौचालय दिनानिमित्त माहिती देण्यात आलेली माहिती सांगण्यात आली व कृतियुक्त स्वच्छता करण्यात आली,माता पालक विद्यार्थी पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी सहशिक्षक राकेश माळी, सीमाताई सोनवणे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
तसेच केंद्र शासनाने 1986साली घेतलेल्या निर्णयानुसार शासनाकडून व शिक्षण विभागाकडून प्राप्त निर्देश नुसार दिनांक 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत राष्ट्रीय एकात्मता अल्पसंख्यांक विकासासाठी कौमी एकता सप्ताहाचे उद्घाटन मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी केंद्र व राज्य शासन शेवटच्या माणसाचे विकासासाठी विविध उपक्रम राबवित असून सर्वांनी एकत्रित या सर्व उपक्रमांत सहभागी होऊन स्वतःचा विकास साधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सुरेश भील,सुभाष भील, सुनील सोनवणे, सखाराम सोनवणे, आदींनी उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
ग्रामपंचायतीचे विस्ताराधिकारी आर् एम पवार, आरिफ शेख सर्व सदस्य गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील ,केंद्रप्रमुख सुनील महाजन, मान्यवरांनी उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
Read Time2 Minute, 23 Second