चाळीसगाव(प्रतिनिधी दि 23):- रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष रोही,सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ पवार, नितीन पाटील, संदीप पाटील, भटु पाटील, दीपक पाटील, गोपाल बेलदार या पथकाने सायंकाळी 16:30 वाजताचे सुमारास चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वाघडू गावातील राजेंद्र लोटन पाटील यांचे शेताचे बांधावर छापा टाकला असता, तेथे 6 जण 52 पत्त्यांवर जुगाराचे खेळावर पैसे लावून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना मिळून आले.
सदर ठिकाणी रक्कम रुपये 2110 ताब्यात घेण्यात आली आहे.
सदर आरोपी जुगार खेळताना मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस अंमलदार दीपक प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे-
1) अनिल नारायण पाटील,
वय- 50 वर्षे , राहणार – वाघडू चाळीसगाव.
2) धोंडीराम देवराम पाटील
वय- 35 वर्षे , राहणार- वाघडू, चाळीसगाव
3) पितांबर हिम्मत पाटील
वय- 45 वर्षे , राहणार- वाघडू, चाळीसगाव
4) रवींद्र विरभान पाटील.
वय- 44 वर्षे , राहणार- वाघडू, चाळीसगाव
5) वैजनाथ महादू पाटील
वय- 57 वर्षे , राहणार- वाघडू, चाळीसगाव
6) बन्सीलाल रामभाऊ वाघ
वय- 58 वर्षे , राहणार- वाघडू, चाळीसगाव
चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने घरातुन विनाकारण बाहेर न पडण्याचे व कोरोना विषाणूच्या अनुषंगाने शासनाने दिलेले आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सविनय सादर-
पोनि विजयकुमार ठाकूरवाड.