
जेसीबी द्वारे नाल्यांची सफाई सुरू,सामाजिक कार्यकर्ते ठरले गुरू
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-27 मे सामाजिक कार्यकर्ते विजय शर्मा यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने चाळीसगांव नागरपरिषदेस खेळण्याचे जेसीबी भेट देत नाले सफाई जेसीबीच्या साह्याने पावसाळ्या पूर्वी करण्याची मागणी केली होती त्या मागणीचा इफेक्ट आज सकाळ पासून नाल्यांची सफाई सुरू
शुक्रवारी शहारातील प्रभाग क्र.५,१४,१५,१६ मधील लहान नाल्याची सफाई करण्यात आली. तसेच आनंदवाडी, बाप्पा पॉंईट, करगाव मोरी जवळील नाल्याची देखील सफाई कर्मचार्यामार्फत करण्यात आली. आजपासून जेसीबीव्दारे शहरातील मोठ्या नाल्याची स्वच्छता करण्यासा प्रारंभ झाला. शहरातील घाटरोडस्थित छाजेड ऑईल मिल परिसरातील इस्मालपुरा भागातील नाल्याची स्वच्छता सुरू करत प्रारंभ करण्यास करण्यात आल्याची माहिती न.पा.चे आधिकारी संजय गोयर यांनी दिली आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच युध्दपातळीवर संपूर्ण शहरात लवकरच नाले सफाई होणार असे चित्र निर्माण झाले आहे, नालेसफाई ची सुरवात मुख्याधिकारी नितीन कापडणीस, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा अशाबाई चव्हाण, आरोग्य सभापती सायली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली न.पा.चे आधिकारी संजय गोयर, तुषार नकवाल, दिलीप चौधरी, सचिन निकुंभ यांच्यासह न.पा.चे कर्मचारी राहुल निकम, विजय जाधव, राजू चौधरी, अनिल गोयर, राजेश चंदले व इतर कर्मचार्यांनी केली आहे.
नाले सफाई सुरू झाल्यामुळे नागरिक मात्र चिंता मुक्त झाले असल्याचे दिसत आहे व शहरात सर्वत्र सामाजिक कार्यकर्ते विजय शर्मा व खुशाल पाटील यांची चर्चा आहे.
Related
More Stories
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते...
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
Average Rating