
ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त संगणक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
दौंड (प्रतिनिधी) :-दि. 14 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मा. पाठक साहेब (समादेशक) SRPF ग्रुप नं-7, यांच्या सहकार्याने संगणक प्रशिक्षण शिबीर दि. 01/03/2020 ते 10/032020 या कालावधीमध्ये घेण्यात आले होते, यामध्ये भाग घेतलेल्या महिला तसेच विद्यार्थी यांना प्रमाणपञ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आर.के. मा. दामनवाड साहेब (PI) SRPF ग्रुप नं -7, मा. बी.वाय.जगताप सर, उपगटशिक्षणाधिकारी, मा. एम.एस. कांबळे सर (PSI) ग्रुप नं -7, सौ.शितलताई मोरे मा. नगरसेविका दौंड, मा. नारायण आप्पा सुळ माजी उपसरपंच गोपाळवाडी, मा. पांडुरंग गाडेकर, संस्थापक अध्यक्ष, महादेवी सेवाभावी संस्था, मा. सौ. वैशाली ताई शिंदे, सरपंच गोपाळवाडी, विलास कांबळे पञकार मा. चांगदेव शेंडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, मा. दत्तात्रय तिगोटे, राज्य सहसचिव महाराष्ट्र एसटी वर्कर्स काॅंग्रेस इंटक आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण शिबीरामध्ये 100 हुन अधिक विद्यार्थी व महिलांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम, व्दितीय, त्रतीय आलेल्या स्पर्धकांना ट्राॅफी व प्रमाणपञ देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थी व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. सदाशिव पोपट रणदिवे सर यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांना सध्याच्या युगात काॅम्प्युटरचे महत्त्व याबद्दल माहिती दिली व इतर कोर्सेस बद्दल मार्गदर्शन केले. तसेच ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या सचिव सौ. वैशाली ताई रणदिवे यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालक यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.प्राध्यापक दिनेश सर यांनी केेले

Related
More Stories
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते...
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
Average Rating