ट्रक च्या धडकेत वृद्धाचा मृत्यू,शहर पोलिसांनी तपास चक्र फिरवत अवघ्या 3 तास 35 मिनिटात फरार ट्रक चालकास घेतले ताब्यात…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 23 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजून 15 मिनीटांनी खडकी बायपास येथे 65 वर्षीय वृद्धाचा ट्रक ची धडक लागल्याने मृत्यू,तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी द्वारका हॉटेल च्या सी सी टीव्ही फुटेज च्या आधारे तपास चक्र फिरवत रात्री10 वाजून 50 मिनीटांनी फरार ट्रक चालकास शिरपूर पोलिसांच्या सहाय्याने शिरपूर टोल नाक्यावर केली अटक.
अशोक शांताराम मराठे वय-65 वर्षे धंदा- वेटरकाम रा.देवळी ता.चाळीसगांव जि.जळगांव हे खडकी बु गावाजवळील चाळीसगांव बायपास महामार्गावर रोड क्रॉस करीत असतांना काल दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी सांय. 7 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास अज्ञात वाहनाने ठोस मारुन त्यांचे अंगावर ट्रक चालवुन त्यास गंभीर जखणी करुन जागीच ठार केले होते. सदर ट्रक चालक हा अपघात केल्याचे माहीत असुन सुध्दा भरधाव वेगाने धुळेच्या दिशेने ट्रकसह निघुन गेल्याची माहीती चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच सदर ट्रक व ट्रक चालकाचा शोध घेणे आवश्यक असल्याने सदर बाब पोलीस निरीक्षक संदिप पाटील मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.रमेश चोपडे, मा.सहा.पोलीस अधिक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांनी सदर ट्रक चालकाचा शोध घेणेकामी मार्गदर्शनपर सुचना दिल्या.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोउनि.श्री.सुहास आव्हाड, पोकॉ/विजय महाजन, पोकॉ/शरद पाटील, पोकॉ/गणेश कुंवर, पोकॉ/नंदुकिशोर महाजन यांना घटनास्थळी जावुन सदर परिसरातील CCTV कॅमेऱ्याचे आधारे आरोपी शोध घेणेकामी कळविले असता , चाळीसगांव-धुळे बायपास रोडवरील द्वारका हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज चेक करुन त्या आधारे ट्रकचा प्रकार लक्षात आला. सदर ट्रक धुळेकडे गेल्याचे लक्षात आल्याने लागलीच खडकी टोल येथील CCTV कॅमेरा चेक केला असता, सदर ट्रकचा क्रं. RJ-11-GC-0513 असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर ट्रक चालकाचे CCTV कॅमेऱ्याचे आधारे सर्व फुटेज व फोटो लागलीच कर्मचारी यांनी प्राप्त करुन घेतले. सदर ट्रक चालक भरधाव वेगाने जात आहे, तसेच त्यांचे नोंदणी क्रमांकावरुन तो परराज्यातील असल्याने तो महाराष्ट्र बाहेर जाण्याचा मार्ग धुळे सिमेवरील शिरपुर, सांगवी, मध्यप्रदेश असा असल्याचा कयास बांधुन लागलीच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोकॉ/विजय महाजन, शरद पाटील, गणेश कुंवर, नंदुकिशोर महाजन यांनी सदर ट्रक ज्या दिशेने गेला तिकडे पाठलाग करणेकामी मार्गदर्शनपर सुचना देवुन , महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक श्री.हेमंत भामरे, महामार्गावरिल धुळे जिल्ह्यातील 1) चाळीसगांव रोड पो.स्टे. 2)सोनगिर पो.स्टे.3)सांगवी पो.स्टे.यांना ट्रक बाबत माहीत देवुन तात्काळ नाकाबंदी लावणेकामी विनंती केली. सोनगीर पो.स्टे. ने रात्री 10.25 वा. माहीती दिली की, सदर ट्रक हा नाकाबंदी लावणे पुर्वीच सोनगीर टोलनाक्यावरुन 09.43 वा. पास होवुन शिरपुर कडे गेला आहे ..पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांनी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक श्री.हेमंत भामरे यांना माहीती देवुन त्यांची मदत मागीतली असता त्यांनी कळवले कि , सदर ट्रक हा शिरपुर टोलनाक्यावरुन गेला नसून त्याठिकाणी शिरपुर महामार्ग सुरक्षा पथकाचे पोना/तुळशीराम पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बॅरेगेटींग लावुन नाकाबंदी लावली आहे …सदर ट्रक चालक हा शिरपुर टोल नाक्यावर भरधाव वेगात येत असतांना नाकाबंदी ठिकाणी हजर असलेले पोना/तुळशीराम पाटील यांनी त्यास ओळखुन लागलीच शिताफीने रात्री 10.50 वा. अडवून ट्रक चालकास पकडले. सदर ट्रकच्या मार्गावर असलेल्या चाळीसगांव शहर पो.स्टे.चे पथकाने लागलीच सदर ठिकाणी जावुन ताब्यात घेवुन चाळीसगांव शहर पो.स्टे.ला ट्रक चालकासह हजर केला आहे.
चाळीसगांव शहर पोलीसांनी एवढ्यावरच न थांबता सदर अपघाताची घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शोधुन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगांव शहर पो.स्टे. येथे ट्रक चालक नामे जावेद खान राजु खान वय- 25 वर्षे रा. गांव-देवला ता.जि.नुह हरियाणा याचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे .. सदर ट्रक चालकाचा वेळेत शोध घेतल्याबद्दल खडकी बु ग्रामस्थांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी अशाच चांगल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
आजच्या घटनेचे CCTV कॅमेराचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. चाळीसगांव-धुळे बायपास रोडवरील द्वारका हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात सदर घटना कैद झाली नसती तर सदर ट्रक चालक हा पसार झाला असता. तरी खडकी बु गावात लवकरच गावाचे सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणार असल्याचे सरपंच श्री.सचिन पवार व उपसरपंच श्री.धनजंय मांडोळे यांनी माहीती दिली आहे.