
ट्रामा केअर सेंटर येथील काही भाग इतर रुग्णांसाठी खुले करा-पीपल्स सोशल फाऊंडेशनची मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव(प्रतिनिधी)-संपूर्ण तालुका व परिसरातील ग्रामीण भागातुन रुग्ण उपचारासाठी चाळीसगाव येथे येत असतात. अनेकदा रात्री अपरात्री इमर्जन्सी केसेस येत असतात. परंतु खासगी रुग्णालये कोविड टेस्ट तसेच आर्थिक अडवणुक करुन रुग्णांना अॅडमिट करुन घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांना उपचाराकरिता जळगाव वा अन्य ठिकाणी जाणे परवडत नाही.
चाळीसगाव शहरात अद्ययावत सुविधा असलेले महात्मा फुले ट्रामा केअर सेंटर आहे. कोविड १९ महामारी च्या काळात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सदर ट्रामा केअर सेंटर कोविड रुग्णांकरता राखीव करण्यात आले आहे. परंतु आता तालुक्याभरात कोविड रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची घटती संख्या लक्षात घेता प्रशासनाने महात्मा फुले ट्रामा केअर सेंटर चा काही भाग सर्वसामान्य नॉन कोविड रुग्णांकरिता खुला करावा. व गोरगरीब नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी असे निवेदन देण्यात आला.यावेळी भगवान पाटील,पीपल्स सोशल फाऊंडेशन अध्यक्ष-आकाश पोळ,विजय जाधव,नितीन निकम,रोहित शिंदे,हर्षल माळी,बाळू पवार,शिवसागर पाटील,भुषण पाटील,महेंद्र कुमावत,राहुल सावळे,गौरव पाटील, कुणाल पाटील, रमाकांत शिरसाठ, हर्षल खलाने, प्रशांत शर्मा,अमोल पवार,राकेश त्रिभुवन, दुर्गेश जाधव,भास्कर रोकडे, अजय पाटील,पारस संगीले आदी उपस्थित होते.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating