अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य निश्चितच समाजाला व या देशाला योग्य दिशा देणारे ठरत आहे.
आतापर्यंत राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमातून संपूर्ण जगाला प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती ज्ञात आहे.अतिशय शिस्तीचा परमार्थ म्हणून या प्रतिष्ठानकडे पाहिले जाते. विशेषत समर्थ आज्ञेशिवाय कोणतेही श्रीसदस्य आपले एकही पाऊल पुढे टाकत नाहीत.ही सर्वात मोठी शिस्त या परमार्थामध्ये नेहमी बघायला मिळते.त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक करावे तितके कमी असल्याच्या भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त करीत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यपुढे नतमस्तक होत मनापासून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.12 रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून चाळीसगाव शहरातील धुळे रोडवरील ट्रामा केअर सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दिवसभरात 153 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.यावेळी उमंग फाऊंडेशनच्या अध्यक्षा संपदा पाटील,नगरसेवक संजय पाटील,भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील,ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार करंबळेकर,अनिल नागरे,अमोल चव्हाण तसेच चाळीसगाव श्री बैठक समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमंग फाऊंडेशनच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी देखील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरोद्गगार काढले.रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याने प्रतिष्ठानने राबविलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणा देणारा असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईसह संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.यात स्वच्छता अभियान,आरोग्य,व्यसनमुक्ती,रक्तदान,त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
रक्तदान शिबिरात संकलित झालेले रक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय जळगाव येथील रक्त केंद्रात सुपूर्द करण्यात आले. यावेळी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.आकाश चौधरी, डॉ.श्रीनिवास पाटील,डॉ. राजेश्वरी खंडागळे, डॉ.लक्ष्मीकांत त्रिपाठी,डॉ. सफोरा तहेरीम, दीपक होन माने ,चेतन पवार, मनीषा पाटील, प्रभाकर पाटील चाळीसगाव ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होते.