अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दिं. 28/07/2020 रोजी साबळेश्वर (पै)ता.केज.जि बीड सुरज कांबळे यांच्या डोक्यावर कुर्हाडीने प्राणघातक हल्ला झाल्याबाबत रविदास चर्मकार युवा फाऊडेशनच्या वतीने दौंड तहसिलदार व दौंड पोलीस स्टेशनला काल दि 4 ऑगस्ट 2020 रोजी निवेदन देण्यात आले,
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ख्याती असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे, आपल्या सर्वांसाठी निश्चित निंदावजनक आहे ,पुणे ,औरंगाबाद, जालना, परभणी, नागपूर, बीड इत्यादी ठिकाणी आशा घटनांमधून हत्याकांड देखील झाल्या आहेत,सर्व प्रकारामुळे अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये सहकार्याबद्दल असंतोष बळावत आहे तसेच सरकार पातळीवरून जातीय अत्याचाराच्या घटनेकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना निर्माण झाली आहे ,तरी वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येऊन जातीय अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने नव्या कृती कार्यक्रम करावा या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे करण्यात आल्या आहेत,
1)जातीय अत्याचाराच्या खुनाच्या घटनांचा तपास सरसकट राज्यगुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा.
2) जातीय अत्याचाराच्या सर्वच घटना यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार द्रुतगती न्यायालयामार्फत सुनिश्चित कालखंडात चालवले जातील यासाठी विशेष न्यायालयीन समिती नियुक्त करण्यात यावी.
3) जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये दुसऱ्यांदा गुन्हा दाखल होणाऱ्या व्यक्तीवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
4) जातीय अत्याचाराच्या घटना नोंद करण्यास तपासामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबतची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करावी.
5) जातीय अत्याचाराच्या घटना मधील अत्याचारित व्यक्तींना शासन धोरणानुसार देण्यात येणारा अर्थसहाय्य निधी 48 तासात देण्यात यावा तसेच मृत्यू पडणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय-निमशासकीय नोकरी देण्यात यावी असे निवेदन संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशन च्या वतीने दौंड तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आले ,यावेळी श्री अमोल कांबळे (दौंड शहर व तालुका अध्यक्ष) यांनी दिली निवेदन देताना श्री.गणेश ढमढरे (दौंड तालुका उपाध्यक्ष) श्री. सुशांत जाधव (युवक सचिव),श्री. अविनाश तिखे (दौंड तालुका सल्लागार),श्री.सागर तावडे (संपर्कप्रमुख),श्री. संतोष जाधव (,नविन गार शाखाप्रमुख) श्री.गणेश दळवी (दौंड तालुका कार्याध्यक्ष) हे उपस्थित होते